Tuesday, 2 August 2011

मला जे वाटले ते मी जाहीर केलेले आहे योग्य वाटल्यास आपली मते कळवा


राम राम,
मित्रानो काळजी पूर्वक वाचा,

जी मंडळी फक्त भूतकाळात राहतात, ती लवकरच भूतकाळात जमा होतात ...

जी मंडळी भविष्य निर्माण करण्यासाठी काम करतात ती इतिहास निर्माण करतात ...
महाराजांनी भविष्यासाठी काम केले... म्हणून आज आपण आहोत..

आपल्यालासुद्धा एक चिरंतन,संस्कारित,बलशाली,सामर्थ्यशाली महाराष्ट्र घडवायचा आहे..
तो महाराष्ट्र इतिहासाच्या कुबड्या घेतलेला नसेल तर त्यातल्या चुका सुधारून इतिहास निर्माण करणारा असेल..
तो महाराष्ट्र नक्कीच जाती पातीच्या जंजाळात अडकलेला नसेल..

कुणी ही चुकीचा इतिहास लिहिला असेल तर त्यांना शिक्षा करावीच,मग तो ब्राह्मण/मराठा/मुस्लीम किंवा अजून कोणीही असो...
(चुकीचे चुकून लिहिणे आणि मुद्दाम एका जातीला त्रास देण्यासाठी इतिहास लिहिणे ह्यात फरक आहे)
महाराष्ट्रा मध्ये समाजामध्ये घाण करणारे निरनिराळ्या जातींमध्ये झाले,
त्याच प्रमाणे चांगली कामे करणारे निरनिराळ्या जातींमध्ये झाले आहेत.

चांगल्या मंडळींना एकत्र आणणे ..
आणी वाईट प्रवृत्तींना नियंत्रणामध्ये ठेवणे हे आपल्याला करायचे आहे..

कारण जर आपण जाती-पती मध्ये भांडण बसलो तर बाहेरचे/आतले शत्रू आपल्याला जिवंत सोडणार नाहीत ....

एक महान महाराष्ट्रा घडवायचा आहे ...,
एक बलाढ्य देश घडायचं आहे,
ज्याबद्दल आपल्या सर्वांना अभिमान वाटेल..

श्री शिव छत्रपतींना अभिमान वाटेल..!!!!!!
मला जे वाटले ते मी जाहीर केलेले आहे योग्य वाटल्यास आपली मते कळवा.

Monday, 18 April 2011

माझी इच्छा

लग्न झालेल्या माणसाच्या आयुष्यात बायको हा एक अविभाज्य घटक असतो . बायकोने कसे वागावे या बाबत अपन फार दक्ष असतो. पण आपल्या जगण्यावर तिचे काहीही बंधन नको अशी प्रत्येक पुरुषाची मनापासून इच्छा असते माझीही तीच इच्छा आहे.